ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अशोक शिंगारे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 (1)(2)(3) अंतर्गत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, ठाणे ग्रामीण जिल्ह्यात घर, सदनिका, दुकान, हॉटेल किंवा अन्य जागा भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, वाढती नागरी वस्ती, औद्योगिक क्षेत्रे आणि परप्रांतीय नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनेक वेळा भाडेकरू किंवा राहणाऱ्या व्यक्तींची ओळख पटत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोणती माहिती द्यावी लागणार?
भाडेकरू ठेवण्यापूर्वी संबंधित मालक, भाडेकरू, सोसायटीचे चेअरमन किंवा इस्टेट एजंट यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात अथवा ऑनलाइन पद्धतीने पुढील माहिती सादर करावी लागणार आहे –
- भाडेकरूचा ओळख पुरावा आणि छायाचित्र
- परप्रांतीय नागरिक असल्यास त्याचे छायाचित्रासह ओळखपत्र
- पूर्वीच्या राहत्या पत्त्याची माहिती
- सध्याचा पत्ता, संबंधित पोलीस ठाणे व नोकरी/व्यवसायाचे ठिकाण
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे
प्रशासनाचे आवाहन:
घरमालक, सोसायटी पदाधिकारी, इस्टेट एजंट आणि व्यावसायिक आस्थापनांनी भाडेकरू ठेवण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे पोलिसांकडे जमा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

More Stories
हॉटेलचालकांनो सावधान! तुकाराम मुंडेंचा अॅक्शन मोड; हॉटेल्स, ढाब्यांसाठी ‘हे’ ५ नियम आता बंधनकारक
पुण्याची ‘सोनम’! लोहगडावर तरुणाचा अपघात नव्हे तर खून; होणारी पत्नी आणि प्रियकर अटकेत
अमरावतीच्या जमीन व्यवहार प्रकरणात राठी कुटुंबाला दिलासा; गुन्हा रद्द